कोरोनाची लढाई चीनने जिंकली

एकही प्रकरण नसल्याची पहिलीच वेळ


 जानेवारीपासूनच चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या देशभरातील थैमानाच्या दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसची झिरो प्रकरणे म्हणजेच कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण चीन देशात उघडकीस आले नाही. चीनमध्ये बुधवारी प्रथमच हा प्रकार घडला.

 या व्हायरसचा चीनमध्ये आता विशेष टिकाव लागत नाहीये. चीनच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, बुधवारी वुहानमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे कोणतेही नवीन प्रकरण कुठल्याच घरात आढळलेले नाही. चीनच्या इतर भागात 34 नवीन प्रकरणे उघडकीस आली हे लोक सर्व बाहेरून चीनमध्ये आलेले आहेत.

परदेशातून येणाऱ्या लोकांमुळे संक्रमण होतेय
 चीनमध्ये परदेशातून येणारे संसर्गग्रस्त लोकांमुळेच बहुतेक लोक संक्रमित होत आहेत. चीनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे हुबेई प्रांतातील मृत्यूच्या 8 नवीन घटना समोर आल्या आहेत. याव्यतिरिक्त कोरोनाची 34 पैकी 21 प्रकरणे बीजिंगमध्ये आहेत. चीनमधील 80,928 लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे तसेच या व्हायरसमुळे 3245 लोक मरण पावलेली आहेत.

लॉकडाऊनमुळे जनजीवन प्रभावित
 कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहा:कार माजला आहे. आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त लोकांनी केवळ कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्याचवेळी180000 पेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसची पहिली घटना चीनच्या वुहानमध्ये आढळली. वुहानमध्ये राहणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे त्या सर्वांना कोरोनाच्या भीतीने आयुष्य व्यतीत करावे लागतेय, हुबेई प्रांतांत काहीवेळ लॉकडाऊन आहे त्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post