खंडणीत अडकलेल्या पत्रकारांचा पोलीस जबाब नोंदवणार !

पुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज अडसूळ याच्याकडून ३४ लाख रुपये जप्त करण्यात खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. दरम्यान, अडसूळ याच्या पोलीस कोठडीत ९ मार्चपर्यंत वाढ झाली आहे. 

पुण्यातील एका डॉक्टरकडे एक आजारी महिला उपचारासाठी गेली असता, बिलावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सदर महिलेने संबंधित डॉक्टरविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर मनोज अडसूळ याने सदर  डॉक्टरला लात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवून १ कोटी ३० लाखाची खंडणी मागितली. पैकी ७५ लाख वसूल केले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याबरोबर उठबस असलेला पोलीस मित्र जयेश कासट याने चोरावर मोर होत अडसूळकडून पाच लाख खंडणी वसूल केली. अडसूळ आणि कासट यांच्यात खंडणीवरून वाद सुरु झाला. दोघांत  जे सांभाषण झाले त्यात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांना प्रकरण मिटवण्यासाठी वाटा देण्याची बाब समोर आली.

जेव्हा मनोज अडसूळ विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हा त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्ण जामीनसाठी अर्ज केला होता, त्यात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांचा उल्लेख केला तसेच कासट यास पाच लाखाची खंडणी दिल्याचे कबूल केले. त्यावरून जयेश कासट विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली आणि खंडणीची पाच लाख रक्कम सुद्धा जप्त झाली. त्यानंतर मनोज अडसूळ यास अटक झाली आणि त्याच्याकडून आतापर्यंत ३४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

अडसूळ याने खंडणीतील ५४ लाख रुपये विविध सहा जणांच्या बँक खात्यावर पाठवले होते, हे सहा जण नेमके कोण आहेत ? त्यात काही पत्रकार आहेत का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. अमोज अडसूळ आणि पोलीस मित्र जयेश कासट यांच्यात खंडणीची रक्कम  वाटणी करण्यावरून जो वाद झाला, त्यातून हे प्रकरण बाहेर आले आहे. 

ते १४ पत्रकार कोण ? 


खंडणी विरोधी पथका समोर जयेश कासट याने काही पत्रकरांची नावे घेतली आहेत. त्यात  स्मार्ट मित्रमधील एक वरिष्ठ पत्रकार, पद्मश्रीच्या पेपर मधील काढून टाकण्यात आलेला सबका बंधू आणि एक रिपोर्टर महाराष्ट्राच्या मानबिंदू मधील एक जण, एका वेबसाईटचा संपादक, काही चॅनल्सचे रिपोर्टर यांची नावे घेतली आहेत.  पोलीस या सर्व पत्रकारांना ताब्यात  घेऊन जबाब  नोंदवणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने