जगभरातून कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा तीन हजारावर

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर दक्षिण कोरियातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. युरोपियन देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. नुकतेच अमेरिकेतही काही रुग्ण कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत आढळले आहेत. जगभरात कोरोनाचा उद्रेक अजूनही कायम आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागाने(WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा तब्बल तीन हजारावर पोहोचला आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे रविवारी 150 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 3000 इतकी झाली आहे. मृत झालेल्या 150 पैकी 149 नागरिक हे हुबेई प्रातांतील असल्याची माहिती चीन राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. 409 नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वाधिक रुग्ण हुबेई प्रांतात आढळले आहेत.


ज्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला नाही, त्यांनाच वुहान शहरातून जाता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. वुहान शहराची लोकसंख्या जवळपास एक कोटी असून 23 जानेवारीपासून शहरातील व्यवहार ठप्प पडले आहेत. सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते.

इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. कोरोना संक्रमित विभागात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. इटलीमध्ये कोरोनाचे 152 संशयित रुग्ण आढळले आहेत. इटली पोलिसांकडून करोना संक्रमित परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. इटलीत 11 परिसर हे कोरोना संक्रमित परिसर असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. लोम्बार्डी परिसरात खबरदारीचे उपाय आखण्यात आले आहेत. इटलीतील जवळपास 50 हजार कुटुंबीयांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सार्वजनिक स्थळी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच अनिवार्य नियमांमुळे उच्च शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी यायचे असूनही ते इटलीतच अडकून आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post