सल्लूभाईचा कोरोनाबाबत सल्ला ऐकून आपण व्हाल थक्क ...


अनुपम खेर पाठोपाठ आता सलमान खाननेही कोरोनावायरस पासून कसे वाचाल यावर जनतेला सल्ला दिला आहे. अभिवादनाचे पारंपारिक मार्ग अवलंबण्याचे त्याने सुचवले आहे. नुकतेच त्याने सोशल मीडिया वर स्वत;च्या वर्कआउट सेशनचा एक फोटो शेअर केला, ज्यात तो शर्टलेस असून हात जोडून नमस्कार करताना दिसला आहे.
‘आपल्या संस्कृतीत नमस्कार, नमस्ते आहे. जेव्हा कोरोनावायरसचा विनाश होईल तेव्हाच हात हात घ्या – शेकहॅंड करा आणि एकमेकांना मिठी मारा.’ असे सलमानने ट्विट केले आहे.
यापूर्वी अनुपम खेरने सोशल मिडीयीवर एक व्हिडियो शेअर करून सांगितले होते की, माझ्या प्रिय बंधूंनो जगभरात कोरोनावायरसचे सावट पसरलेय त्यामुळे हात मिळवणे किंवा मिठी मारणे ह्या गोष्टी करणे टाळा याऊलट आपली प्राचीन परंपरा नमस्कार करायला सांगते तर कुणी भेटले असता तुम्हीही नमस्ते, नमस्कार करा. अनेक वेळा आपल्याला सावध रहाणेच गरजेचे असते. एकमेकांना मिठी मारण्यात आपली अधिक ऊर्जा निघून जाते त्याऐवजी आपलेच हात जोडून नमस्कार केले असता कुठल्याच प्रकारचे व्हायरस वा संक्रमण होण्याचा धोका उद्भवत नाही. म्हणून सगऴ्यांनी नमस्ते/ नमस्कार च करा.
भारतात कोरोनावायरस मुळे संक्रमित झालेले 29 रूग्ण आहेत ज्यात 3 केरळचे आहेत जे वुहान मधून भारतात परतले होते दरम्यान ते आता व्यवस्थित आहेत. दिल्लीमध्ये इटलीतून परतलेला एक रूग्ण आहे ज्यावर अजूनही उपचार सूरू आहेत.आग्र्यामध्ये सहा जण कोरोनारुग्ण आढळलेत ज्यांना त्या दिल्लीतील रुग्णामुळेच संक्रमण झाले आहे.गुरगावात पेटीएम कंपनीची एक कर्मचारी कोरोनाव्हायरस पोझिटिव्ह आढळला आहे तसेच जयपूरमध्ये इटलीतून पर्यटनाला आलेले सोळा लोक व त्यांचा एक भारतीय ड्रायव्हर आहे तर एक कोरोनारुग्ण तेलंगणामध्ये असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post