एकाच दिवशी आई आणि मुलीचे लग्न...

हनीमूनदेखील निघाल्या एकत्रच...

प्रत्येक आई आपल्या मुलीच्या लग्नाचे स्वप्न बाळगते, परंतु आपण एकाच दिवशी दोन्ही आई आणि मुलीचे लग्न पाहिले आहे का? तसे नसल्यास आयर्लंडमध्ये अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रत्येक आई ही तिच्या मुलीची सर्वात चांगली आणि जवळची मैत्रिण असते, हे सर्वांना माहित आहे. पण आयर्लंड इथे रहाणाऱ्या एका आई आणि मुलीने एकाच दिवशी लग्न करून त्यांतील मैत्री आणखी खास केली आहे. एवढेच नाही तर ते लोक एकत्र हनिमूनवरही गेलेले आहेत.


खरं तर, आयर्लंडमध्ये राहणारी 53 वर्षीय तृषा डफी ही तिच्या मुलीसोबत खूप चांगला बॉन्ड शेअर करते.तिने आयुष्यातील सुख आणि दु: खाच्या सर्व क्षणांत आपल्या मुलीचे समर्थन करते. अशा परिस्थितीत तिला 35 वर्षीय मुलगी एस्लिंगचे लग्न आणि तिचे स्वत:चे लग्न एकाच दिवशी आयोजित करावे अशी इच्छा झाली. जरी  तृषा डफीचे हे दुसरे लग्न असले तरी त्याचा उत्साह एन तारुण्यातील लग्नापेक्षा कमी नव्हता. जेव्हा तिने आपल्या मुलीला असे करण्यास सांगितले तेव्हा ती खूप आनंदित झाली. आयर्लंडमधील हॉटेलमध्ये एकाच दिवशी त्या लग्नबंधनात अडकल्या. दरम्यान, आई आणि मुलीच्या या अनोख्या लग्नसमारंभात सुमारे 160 पाहुणे उपस्थित होते.


35 वर्षाच्या आयसलिंगने मॉरिस नावाच्या मुलाशी लग्न केले, तर तिची आई त्रिशाचे लग्न 71 वर्षीय जोए एफ याच्याशी झाले. एस्लिंग म्हणाली, 'जेव्हा माझ्या आईने मला एकत्र लग्न करण्याचा सल्ला दिला तेव्हा मला वाटलं की हा काय विनोद आहे, परंतु जेव्हा आम्ही याबद्दल शांतपणे बोललो तेव्हा मला ती चांगली कल्पना वाटली.


तिने असेही म्हटले आहे की , मी सर्व गोष्टी माझ्या आईबरोबर शेअर करत असते आणि आठवड्याच्या शेवटाला म्हणजे विकेंडलाही आईसोबत आनंद लुटत असते अशा परिस्थितीत एकाच दिवशी आमचा लग्न करण्याचा निर्णय देखील मला मजा येणारा आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या हनिमूनचीही योजना एकत्र आखलेली आहे. आता एस्लिंगची इच्छा आहे की, यापुढे तिची आई आणि तिचे मूल एकत्र जन्माला यावे.

Post a Comment

Previous Post Next Post